जावई आणि सासरे.

शिर्षक :-काही संवाद मनातले!!

सासरे:- अरे नितीन ,उठ नां रे! जरा बघ पल्लु निघालीय आॅफिसला .तिने डबा घेतला का?बघ तीला रिक्षा पकडून दे!(आळशी कुठला-मनातल्या मनात!)

नितीन:-Don’t worry dad!तुमची पल्लु आता कुक्कुल बाळ नाही आहे!आज तिची कार बिघडलीय तर पकडेल की रिक्षा स्वत:शोधून!(तुम्ही अगदी तिला लाडावून ठेवलेय-मनातल्या मनात)

सासरे:-अरे पण तुला लग्नाच्याच वेळेस सांगितले होते नां!तीला कसलीच कामाची सवय नाही.आम्ही अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवले  हों तीला!आता बिचारी किती कष्ट करतेय(हा ढोम्या ,काडीचीही मदत करतांना दिसत नाही)

नितीन:-बाबा! कां उगाच जीव काढतां ?chill मारो chill! अहो तुम्ही कालच घरी पहिल्यांदा आलात ना?.

काल माझी महत्वाची मिटींग होती,म्हणून उशिरा घरी आलो.नाहीतर पल्लु यायच्या आत भांडी लावणे,कुकर चढवणे ही कामे मीच करतो!स्वयंपाकाच्या मावशी पोळी भाजी करून जातात!तुमच्या लेकीला फक्त आमटी,कोशिंबीर करायची असते(तरीही बाईसाहेब दमलेल्याच असतात)

सासरेबुवा:-असे हों!मला वाटले पल्लुची खुपच नोकरी व घर अशी कुतरओढ होतेय.

चालू द्या! चालू द्या!भांडू नका म्हणजे झाले एकमेकांशी!गुण्याने रहा.(थोडे दिवस इथे राहून बच्चमंजी बघतोच तुझी घरातली मदत!नाहीतर सरळ लेकीला घरी घेऊनजातो आराम द्यायला!—-मनातल्या मनात).

 

 

error: