जीवन ज्यांना कळले हो!

 निवृत्ती समारंभाचा सोहळा पार पाडून,वसुधाला सगळ्यांनी सन्मानाने घरी पोहचवले.

  घरी स्वागत करणारे कुणी नव्हतेच!एक रखमाबाई सोडल्यातर एक निरव शांतता घरी नांदत असे!.कपडे बदलून गॅलरीतल्या आरामखुर्चीत वसुधाने बसत थकून डोळे मिटले.

    डोळ्यांसमोर आजचा समारंभ आला.हेडमास्तरची केबिन ते स्टेज ,विद्यार्थी गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव तीच्यावर करत होते.तीचे सहकारी व लाडके विद्यार्थी ह्यांनी खुप झोकात तीचा निरोपसमारंभ आखला होता.

  मिटल्या डोळ्यांसमोर प्रथम तीचा भुतकाळ आला.

   शालेय जीवनात अतिशय हुशार,असणारी वसु तेव्हा १०वीला होती.बोर्डाच्या परिक्षेचा शेवटचा पेपर होता.सगळ्या मैत्रीणींनी ठरवले होते की पेपर संपल्यावर २दिवस गोवा ट्रीपला जायचे!मोठ्या मुश्कीलीने वसुला परवानगी मिळाली होती .पण नियती मनात हासत होती.

  पेपर देऊन आनंदाने उड्या मारतच वसु घरी आली तर,दारासमोर ही गर्दी! स्वयंपाक करतांना घरातील सिलेंडरचा स्फोट होऊन तीचे आई-बाबा गंभीर जखमी झाले होते व त्यांना हाॅस्पिटलला नेत होते.

 घाबरलेली वसु अॅंम्बुलन्समध्ये बसली व तीच्या आई वडिलांनी तिच्याकडे बघतच प्राण सोडले!.

      मेंदुला मोठ्ठा धक्का बसल्याने वसुची अवस्था वेड्यासारखीच झाली.दु:खाचा डोंगरच कोसळला.फारसे नातेवाईक नव्हतेच त्यांना.लोकलाजेस्तव एका दुरच्या काका काकूंनी तीला घरी नेले.पण ही ब्याद कायमची आपल्या गळ्यात पडलीय असे काकूला वाटून काकू खुप हीनतेने तीला वागणूक देई.

  तर तीच्या वासनांध काकाला आयतीच तरूण शिकार मिळाली!त्याच्या शारिरीक अत्याचाराला ती बळी पडली .वारंवार हे प्रसंग येऊ लागल्यावर हे लाचार घृणास्पद आयुष्य संपवावे ह्या विचाराने ती आत्महत्येला प्रवृत्त झाली!बाहेर जगात ती कुठे जाणार?

  पण आईच्या नवनाथातील पोथीचे वाक्य तीला आठवले”ह्या जन्मीचे भोग भोगुनच संपवावे लागतात”आत्महत्या ही पळवाट आहे”

  स्वर्गातील आईबाबा पण दु:खी होतील!आपल्याला त्यांचे स्वप्न पुर्ण करायचे आहे त्यांचे नांव उज्वल करायचे ह्या एकाच ध्येयाने तीला झपाटले.मीच माझ्या जीवनाची शिल्पकार होणार हा मंत्र मनाशी जपत तीने मैत्रीणीकरवे गुपचुप D.Ed.चा फाॅर्म भरला.

  १०वीला उत्तम मार्क असल्याने प्रवेश व शिष्यवृत्तीही मिळाली.वसतीगृहात राहून आधी शिक्षण मग नोकरी!

 नको त्या वातावरणातून पण सुटका झाली.नोकरी करतच M.A,B.Ed.M.Phil असा प्रवास करत ती हेडमास्तर झाली.भुतकाळामुळे वैवाहिक जीवनाची इच्छाच मेली होती.विद्यादानासारखे पवित्र कार्य करत तीने विद्यार्थ्यांतच आपला संसार थाटला,त्यांना माया लावली.

     आता उर्वरीत आयुष्य जगप्रवास करावा व सुखात घालवावे असे तीने ठरवले.

  जर त्या काळरात्री रेल्वेरूळावर आपण जीव दिला असतां तर आज हा सुखाचा दिवस आपल्याला दिसलाच नसतां !.

   “जगणे तीला कळले हो”!.

error: