काव्य

जेव्हा भावना मनात दाटतात व कागदावर उमटतात कविता बनत जाते!अश्या वेगवेगळ्या थाटातील कविता ह्या सदराखाली तुम्ही अनुभवाल.

काव्यपुर्ती

चित्रकाव्य.

शिर्षक:-प्रित

 

तुझी ,माझी प्रित बहरते,
या यमुनेतीरी!
किती विश्वासे ,मान टाकीसी
तू मम् खांद्यावरी!

साक्ष देण्या उभा आहे,

 

Read More…

मनातील कविता

काव्यपुर्ती

थंडीची किमया.

शिर्षक:-पहाटेची थंडी.

थंडी गुलाबी,

येई अंगावरी!

गोड शिरशिरी,

उठे मनावरी!—-१.

प्रभाती दाट धुके,

नभी पसरले!

रवी किरणांचे,

दुत ओशाळले!—–२.

 

काव्यपुर्ती

अमूल्य प्रेम.

नाही उपमा जगात,

मायबापाच्या प्रेमाला!

अमूल्य प्रेमाची त्या नाही,

बरोबरी कशाला!…..१.

वात्सल्याचे काळीज ,

कोंदण तया ममतेचे!

डोळ्यापुढे स्वप्न सदा,

अपत्याच्या उज्वलतेचे….२.

 

Read more..

 

काव्यपुर्ती

अपराध

शिर्षक:-सावळबाधा

अपराध माझा,

इतुकाची झाला!

काल पाहिले मी,

सावळ्या मोहनाला!—१.

विसरून देहभान,

ऐकली बासरी तयाची!

गारुड पसरे मनावर,

लाज सोडली जनाची!–२.

 

काव्यपुर्ती

अर्चना नवदुर्गांची

शिर्षक:-महती नवदुर्गांची!

नऊ रूपे घेऊन आली,

दुर्गा दुष्टांच्या संहारा!

होते साहत देव मानव,

असुरांचा अन्यायाचा मारा!।।१।।

“शैलपुत्री”पाषाण कन्या,

देई स्थिरता मनाची!

लिन पदी होता तीयेच्या,

होते शांती भावनांची!।।२।।

Read more..

काव्यपुर्ती

आई माऊली गं माझी

शीर्षक:- अंबेची आराधना

आई माऊली गं माझी,सुख दुःखात  सावली,

मनोभावे आराधना,अंबा मजसी पावली !||धृ||

नऊ दिन चालतसे,अंबे तुझाच जागर,

संकटात वेगे वेगे,भक्तां पावसी सत्वर,

ओढ वाटे मनी तुझी, मुर्ती नयनी भावली,

आई माऊली गं माझी,सुख दुःखात सावली,

मनोभावे आराधना, अंबा मजसी पावली||१||

 

Read more..

 

काव्यपुर्ती

स्वातंत्र्य

शीर्षक:- घालमेल.

पिंजऱ्यातील राघू बोले,

काहो कोंडता असे मला?

उडण्याचे स्वातंत्र्य गमावले,

जीव  इथे माझा घुसमटला !—१.

हिरव्याकंच रानोमाळी,

स्वैर झेपावत होतो  गगनी!

सखे सोबती,आप्त सोयरे,

मोद लुटत होतो जीवनी!–२.

  Read more..

अष्टाक्षरी काव्य

उगवला रविवार!

शिर्षक:-नेमेची येतो हा रविवार!

उगवला,रविवार]

आळसाला,नाही थारा!

कामे आठवड्याची,गे

उरकावी भराभरा!

Read more….

बालगीत

आई म्हणते...

शिर्षक:- गाऱ्हाणे!

वर्ण :-१४.

देवबाप्पा,देवबाप्पा ऐक ना रे जरा!

तूच माझा आहेस नां मित्र खराखुरा? ।।धृ।।

आई म्हणते,करूयात तुला डाॅक्टर

बाबा सांगती,तो होणार इंजिनीअर!

भांडाभांडी,ऐकून मी करतो पोबारा!

देवबाप्पा,देवबाप्पा ऐक नां रे जरा ... ..।।१।।

Read more.... .

मुक्तछंद काव्य

गोधडी

शिर्षक:-गोधडी मायेची!

 थरथरणारा हात,चेहऱ्यावर विसावला!

दिवा अंधुक नजरेत,ओळखीचा पेटला!

घट्ट मिठी प्रेमाची तीने मला मारली,

जीव तीचा होता,माझ्यासाठी आसावला!

 

अष्टाक्षरी काव्य

मावळत्या दिनकरा

शिर्षक:-ऋणाईत सृष्टी !

मावळत्या दिनकरा,

अस्तमानी तू निघाला!

सडा पिवळा नारींगी,

दशदिशा शिंपडला,!।।१

बालगीत

आवडता पदार्थ

शिर्षक-पुरणपोळी!

आवडते मज बहु,

गोड गोड पुरणपोळी!

येता सण कोणताही,

दसरा असो वा होळी!।।१।।

 

मायबोली

मायबोली

शिर्षक:-माझी मायबोली !

माझी मायबोली मराठी,

बदलते मैला-मैलावर!

कधी लडिवाळ मृदु!

कधी रांगडी कणखर!

 

अष्टाक्षरी काव्य लेखन

आनंदाच्या गावा जाऊ!

शिर्षक:-आनंदाचे स्रोत!

मनावर मरगळ,

एक अनामिक भिती!

रोजचेच हे जगणे,

झाली परकी ही माती!।।१।।

 

अष्टाक्षरी काव्य

आई

शिर्षक:-आई आनंदाचा ठेवा!

आई शब्दातच जादू,

जगण्याचे बळ सारे!

जन्मताच आई देते,

तीच्या अमृताच्या धारे!।।१।।

 

हा खेळ चांदण्याचा

हा खेळ चांदण्याचा

शिर्षक:-लपंडाव.

उगवला रजनीकांत ,

सवे लवाजमा चांदण्यांचा!

बादशहा हा जणू,गगनी हिंडे

घेत समाचार ह्या पृथ्वीचा!।।१।।

Read more...

चित्र काव्य

निसर्गाशी संगत!

शिर्षक:-निसर्गाशी संगत!

तन्मयतेने घेऊनी कुंतला,

चित्र रेखिते निसर्गाचे!

गुलाब पुष्प उमटे पटलावर

गुपित हृदयातल्या प्रितीचे!

Read more....

 

शंकरपाळी काव्य

शंकरपाळी काव्य

मी

सुज्ञ

सुजाण

      Read more...

चाराक्षरी काव्य

धुळवड

शिर्षक:-स्वप्नातली!

सण होळी,

दिन दुजा,

धुळवड,

येई मजा!।।१।।

Read more...

 

error: