काव्य
जेव्हा भावना मनात दाटतात व कागदावर उमटतात कविता बनत जाते!अश्या वेगवेगळ्या थाटातील कविता ह्या सदराखाली तुम्ही अनुभवाल.
मनातील कविता

गझल
मंदाकिनी वृत्त
गागालगा गागालगा गागालगा गागालगा
आतातरी ये नां सखे,दाहीदिशा सांजावल्या
हा हुंदका दाटे गळा,आशा मनी पालावल्या!
Read more...
दशपदी काव्य
ओंजळ तुझ्या चरणांशी!
ओंजळ तुझ्या चरणांशी फुलांची,वाहतो भगवंता!
तूच सकलांचा भाग्य विधाता,रे कृपावंता!।।१।।
तुझ्या हृदयात,नसे भेदभाव
Read more...

प्रीतीची कळी हृदयात फुलली
शिर्षक:-ओढ ही हृदयातली!

द्रोण काव्य
जीवन माझे!

द्रोण काव्य
जीवन माझे!

अष्टाक्षरी काव्य
मीच माझा शिल्पकार.
शिर्षक:-सुख दुःखाचा हिंदोळा!
माझ्या मनास पुसले,
कोण तुला सुखावतो!
आनंदात जगण्याचा,
मार्ग रोजचा दावतो!।।१।।

कवितेवर बोलू काही
कवितेवर बोलू काही!
शिर्षक:-कवितेचा जन्म!
मनातील भावनांचे,
शब्द मोतीच झाले!
झरझरा सांडोनिया,
कागदावरी पसरले!

षडाक्षरी
स्मितहास्य तुझे.

काव्यपुर्ती
चित्रकाव्य.
शिर्षक:-प्रित
तुझी ,माझी प्रित बहरते,
या यमुनेतीरी!
किती विश्वासे ,मान टाकीसी
तू मम् खांद्यावरी!
साक्ष देण्या उभा आहे,
Read More…
—————————
विषय:- कान्हा वाजवितो बासरी!
———————————-
शिर्षक:-आळवणी
श्रावण अष्टमीस बाई,नवल ते घडले!
कारागृही देवकीपोटी,श्री हरी जन्मले! ।।१।।
देवकीचा अलौकिक सुत हा,वाढे नंदाघरी !
नंदनवन हे जणू फुलले ,आहे यमुनेतीरी ! ।।२।।
गोप-गोपींसवे रचूनी रास,खेळ न्यारे करी !
भुल सर्वां पाडी,सुरेल वाजवूनी कान्हा ती बासरी ! ।।३।।
वेडी राधा, वेडे गोकुळ,मधुर मुरलीसाठी !
हासत हासत , कान्हा रचे महाभारत यमुनेकाठी !।।४।।
दुष्टा संहारण्या घेतला तेव्हा,जन्म तुम्ही देवा !
कलियुगाचा विनाश रोखण्या,अवतार परत घ्यावा !।।५।
—————————
विषय:- भू मंडळ सजले हे!
———————————-
तगमग,तगमग
धरतीस ,ह्या जाहली!
कधी ,येई पावसाळा?
मनी, संचीत बैसली !
आतुरता,मिलनाची ,
सांगू कशी? कोणापाशी?
मन,मोकळे करण्या ,
धावे ,ती , सागरापाशी !
सागरासी , आली दया !
दूत धाडीले,नभात !
धरतीचे,गुज सांगे,
बाष्प ,नभाच्या कानात !
नभ झाला,कासावीस ,
धरतीला ,भेटण्याला !
वीज , देई चपराक ,
उतावळ्या त्या,नभाला !
नटविण्या धरतीला,
सर ,आली ती धावून !
शालू ,चुडा तो हिरवा ,
गेली , तीला नेसवून !
भू मंडळ ,सजले हे ,
वऱ्हाडींच्या ,स्वागतास !
देव संगे, येती त्यांच्या,
साक्ष देण्या , मिलनास !
—————————
विषय:-निर्णय
———————————-
“जरा येऊन जातेस का? “थरथरतया आवाजात
समोरच्या आजींचा फोन आला,
आणि माझ्या पोटात मोठठा गोळाच उठला!
गिळता येत नाहीये ,कसकसही आहे अंगात,
कोरोनाचीच लक्षणे , आजी सांगत होत्या क्रमात !
फोन ऐकताच माझा पुर्ण देह शहारला,
काय करावे कळेना , माझा हॅम्लेटच झाला .
लेक आहे परदेशी ,जवळ नाही कुणी,
लाॅकडाउन मध्ये , आजींवर आली आहे आणीबाणी!
म्हातारी सासू ,लहान लेकरू पदरात,
सांगा कशी धावत येऊ ?आजी तुमच्या दारात?
मागचया वर्षीच्या बाळंतपणातील आजींची मदत आठवली,
माझ्याच मनाची मला खुप लाज वाटली!
ह्रदयाचे ठोके , जलद पडू लागले
पण मेंदूने मात्र , निर्णय पटापट घेतले!
डाॅकटरांना केला फोन ,ओढणीने झाकला चेहरा,
हातमोजे घातले हातात,रेनकोटचा घेतला सहारा!
आजींची किल्ली घेऊन दार उघडून गेले,
दयनीय त्यांची अवस्था बघून ,सारे अवसानच गळाले!
“गरम चहा थोडा पाजतेस का गं,पाणी नाही पोटात,
बघुनच तुला जीवात जीव आला”आजी बोलल्या कष्टात.’
डोळ्यातलं पाणी सारून ,चहा केला चटकन,
मऊ लापशीही ,शिजवली आधणात पटकन.
उन उन नाश्ता पाण्याने आजीही तरारलया,
आलेल्या डाॅकटरांचया पटकन स्वाधीन झाल्या !
चौदा दिवसांठी आजींना ICU त हलवले,
रडणारे लेकरू उचलतांना , मन होते धास्तावले!
माणूसकीचे साधे नाते ,निभावणे झाले आहे जड
परमेश्वरा कधी करशील ,सारी स्थिती आता धड?
नको देऊ पैसाअडका, नको ती रूपकांती,
सुखी होण्या आता दे,फक्त आम्हा मनशांती
फक्त आम्हा मनशांती
—————————
विषय:-अनंत जन्माची पुण्याई!
———————————-
शिर्षक:-मातृभुमी
अनंत जन्माची पुण्याई,
लाभली अशी ही ,भारत भुमी !
घेतोय इथे मोकळा श्वास !
नाही पारतंत्र्याच्या विळख्यात
पोटापुरता मिळे घास,नाही अधिकाचा हव्यास !
संत ,महात्म्यांची भुमी ,पवित्र सुगंध इथल्या मातीला !
संस्काराचे वारे वाहती,आदर मिळे इथे वयाला!
इतिहासाची सुवर्ण पाने,साक्ष देती इथे भविष्या,
प्रगतीची ही वाटचाल भवितव्याची उज्वल आशा !
मंदिर मस्जिद इथे परंपरा,
टोकाची नसे ,धर्मांधता ,
संकट येतां देशावरी,एकोप्याने वागे जनता!
विविध प्रांती ,विविध संस्कृती,
उच्च निच हा भेद नाही !
निसर्गाची उधळण कोठे,स्वर्गच उतरे धरेवरी!
मातृभुमी ही प्यारी मजला,
देई सुखाची शांत निद्रा!
गरिबितही असे सुख इथे,
अन् विश्वास जगण्याला !
—————————
विषय:- तुज नमो क्रांतीविरा !
———————————-
शिर्षक:-महानायक !
जन्मुनी ,बंगाल प्रांती,
स्वातंत्र्याचा ,ध्यास ,घेई!
सुखी आयुष्य,त्यागुनी ,
इतिहासा ,दिशा देई !
उज्वल भविष्य होते,
सुभाष चंद्रा,तुमचे!
गणित मांडले,परी
तुम्ही ,देश स्वातंत्र्याचे !
साथ न मिळाली,तुम्हा
तथाकथित मित्रांची,
उभारली सेना ,घेई
मदत ,परराष्ट्रांची !
नवी दिशा ,दिली जनां,
लढण्या शत्रुं सोबत!
खळबळ,उडवली
साऱ्या,विश्व जगतात !
आझादीचा नारा घुमे,
स्वातंत्रास जोर ,आला !
महानायक ,भारता
तुमच्या रूपे लाभला !
स्वातंत्र्य मिळोनी गेले,
परी घात झाला खरा!
वीर मरणा,सलाम
तुज,नमो क्रांतीवीरा!
—————————
विषय:- का रे असा छळतोस?
———————————-
का रे छळतोस असा मनोहरा?
यशोदा पुसे धरूनीया करा!
गोप गोपींना छेडीसी,
दही दुध लोणी पळविसी!
लाज माझी काढूनी ,लाघवी हसतोस?
का रे चित्तचोरा छळतोस?
गोड मुरलीने भुरळ पाडीसी,
यमुना तीरी खेळ मांडीसी,
वस्त्रे दडवूनी गोपींना का रडवितो?
सांग मोहना , का रे असा छळतो?
पुतना मावशी जीवे मारीसी?
कालीया सर्पा पदी तुडविसी?
साहसे तुझ्या या जीव माझा उडतो!
सांग कन्हैया का मला छळतो?
पुसे कृष्ण ,घाली कर कंठी यशोदेच्या!
इतुका का मी छळतो तुला?
सोडून जाऊ का या गोकुळाला?
काढू नको मग मम् आठवणींना!
घाबरी यशोदा ,म्हणे नंदलाला !
लटके माझे हे ,रागावणे !
आवडे सर्वां ,तुझे गोड छळणे!
नको जाऊ कुठे रे तु नंदलाला,
तुझ्याविना अर्थ न उरे जगण्याला!
—————————
विषय-सरसर पाऊस पडतोय रे!
———————————-
शिर्षक:-संतत धार
सरसर पाऊस पडतोय रे!
आसमंत धुंद झालाय रे !
अत्तराचा फाया उघडला,
मृदगंधाने जीव वेडावला ,
बेधुंद नशा चढली रे !
सरसर पाऊस पडतोय रे!
धुक्याची शाल ,अंगावरी,
विजेची लखलख नभांतरी,
पाण्याने ठेका धरलाय रे !
सरसर पाऊस पडतोय रे !
सुसाट वारा,घुमु लागला ,
काळ्या ढगांना , पांगवून गेला ,
सरीचा ठेका मोडला रे !
सरसर पाऊस पडतोय रे !
बळीराजाने पेरणी केली,
धरती हिरवा शालू नेसली,
पाण्याची तळी भरली रे,
सरसर पाऊस पडतोय रे!
बघतां बघतां ,पाणी साचले,
व्यवहार सगळे ठप्प जहाले ,
शाळा,काॅलेज बंद पडली रे,
सरसर पाऊस पडतोय रे!
रस्त्यावरचे संसार,विस्कटून गेले,
पुराचे थैमान सुरू जहाले,
डोळ्याला संतत धार ,लागली रे!
सरसर पाऊस पडतोय रे!
—————————
विषय:-श्रावणी छटा!
——————————-
शिर्षक:-श्रावण -बहार !
आला आला श्रावण,सणासुदीचा न्यारा महिना !
व्रत वैकल्ये किती?दिन सरे कसा ते कळेना ! ।।१।।
आषाढात कोसळून,नभ गेले बघा गळून !
श्रावणातली सर येई,संगे घेऊनीया उन ! ।।२।।
पुर आला हिरव्या रंगाला,निसर्ग टाकी कात !
गोफ इंद्रधनुचा नभी,मोर दंगला नृत्यात ! ।।३।।
धवल ते धबधबे,कोसळती कडे कपारी !
आनंद लुटण्या भिजण्याचा,सेना जमली सारी! ।।४।।
श्रावण -बहार नयनात ,किती किती साठवू?
रूप गोजीरे देवाजीचे ,मनी आठवू आठवू ? ।।५।।
—————————
विषय:- रम्य ते बालपण !
——————————-
रम्य ते बालपण,चिंचा बोरांची आठवण,
गोट्या,चिंचोके,खडू ,माळा,तिकीटे,
दप्तरभर साठवण !
शाळेत रमत गमत तासाभराचे जाणे,
कधी कट्टी,वा बट्टी, आणाभाकांचे बोलणे !
गाढ श्रद्धा ,गुरूंवरी ,शपथ आईची ते घेणे!
पाऊस नभी भरला ,तरीछत्री विनाच
शाळेत जाणे!
तळे पाण्याचे,शाळेभोवती,होड्या तरंगती त्यात,
डबके दिसतां चिखलाचे,पाय नाचती,तयात !
रंगपंचमी शाईची,शर्टावर दिसे उठून !
बोलणी बसती घरोघरी,ह्या नाहक खोड्यांवरून!
निकालाचा येता दिन ,उठे पोटात गोळा !
रम्य ते बालपण,रम्य ती शाळा!
हवेहवेसे वाटणारे ,बाल्य गेले ते उडून !
व्यवाहाराच्या चिखलात ,आयुष्य बसले रूतून !
—————————
विषय:- फक्त तुझ्याच साठी !
——————————-
शिर्षक:-रे गणराया!
तुझ्याच साठी गणराया!
आता सावरलय मन!
गोळा केला आत्मविश्वास,
अन् जागृत केले तन!
कित्येक दिवसात घरात,
आशेचे किरण डोकावले नाही,
आता तुझ्या आगमने,
मन देतेय ग्वाही!
विघ्नहर्ता तू,म्हणून आम्ही,
भजतो तुला सारे,
जगावर आलेल्या महामारीवर,
तूच उपाय शोध रे!
सापडू दे परत माणसातले,
हरवलेले माणूसपण,
आत्मविश्वास,व ते
आशादायी जीवन!
——————-
विषय:-चित्रकाव्य.
——————————
शिर्षक:-प्रित
तुझी ,माझी प्रित बहरते,
या यमुनेतीरी!
किती विश्वासे ,मान टाकीसी
तू मम् खांद्यावरी!
साक्ष देण्या उभा आहे,
तो धवल ताजमहाल!
वेधी नजर ,सकल विश्वाची
आहे ,अद्भुत नवल!
बादशहाच्या अमर प्रीतीची तो,
कहाणी सांगे जगा!
या इतिहासाच्या साक्षीने,
प्रित अपुली येऊ दे रंगा!
जीवन नौका अशीच तरंगू दे,
हलकेच जीवनसागरी!
तुझी -माझी साथ राहू दे,
घट्ट जीवनभरी!
कृष्ण राधेचेही ,प्रेम बहरले
याच यमुनेकाठी!
वाटे जन्मलो आपण दोघे,
भेटण्या,जन्म जन्मांतरासाठी!
शब्दरजनी साहित्य समुह आयोजित भव्य राज्यस्तरीय उपक्रम
————-
विषय:- पैठणी!
—————
शिर्षक:-मायेची पैठणी!
स्त्री सुलभ लज्जेने,मोठी होत गेले
साडी नेसण्यासाठी,मन अधिरे झाले!
सुंदर जरतारी काठ,बुट्टेदार नक्षी
मऊ रेशमी स्पर्शासाठी,मन आसुसले!
नव्हती मनाला तेव्हा,पैठणीची ओळख!
साध्या मोहक रेशमामध्ये,जीव होता रमत!
पण एके दिनी,आईला खास आली भेट!
येवल्याहून बाबांनी धाडली होती गंमत!
राणी रंगाची पैठणी,त्याचा हातभर पदर!
जांभळी रेशमी बुट्टी,होती अंगभर!
सौंदर्याच्या ह्या खजिन्यावर,ठरत नव्हती नजर,
पदरावरच्या,मोरांनी आणला होता बहर!
एके सुदिनी, आईने मला नखशिखांत नटवले!
मराठमोळे साज,अंगभर चढवले
चकित होऊन,मी पहातच राहिले,
पैठणीच्या पेहरावात,रूप माझे सजले!
एकविसाव्या वाढदिवसाची,ती भेट अपुर्वाईची!
काळजालाच,भिडली ही गंमत आई बाबांची!
भर पडली कपाटात,नंतर कितीतरी पैठणींची,
पहिलीच हृदयात ठसलीय,मायेच्या स्पर्शाची!