आधुनिक दुर्गा!

  सुजाताने घड्याळ्यात पाहिले,

आज पण८वाजले होते!काम उरकण्याच्या नादात, घड्याळ्याकडे लक्षच गेले नाही.घाईने पर्स किल्ल्या,मोबाईल उचलत,ती आॅफिसबाहेर पळतच आली.घाईतच तीने activa सुरू केली.

    तीचे घर शहराबाहेर,गावात असल्याने व हायवेनंतरचा १५ मी.रस्ता जरा शेतातून असल्याने तीला रात्री एकटीला खुप भिती वाटायची.ह्या शहरात नोकरी मिळाली पण परवडणारे घर गावात घ्यावे लागले!.

   घरी इन् मिन् ३माणसे.आई, ५वर्षाखाली कंपनी बंद पडल्याने,घरीबसलेले बाबा,व ती.

    संगणक अभियंता असलेली,सुजाता चारचौघात उठून दिसे.

    गेले २,३आठवडे,तीला नविनच भिती छळत होती.हायवेला ५,६जणांचे टोळके,तीची वाटच बघत उभे असे.ती येतांना दिसली की,शिट्ट्या अश्लील टोमणे,सुरू होत.सकाळी रस्त्यात गर्दी असल्याने ती तिकडे दुर्लक्ष करे.पण रात्री सुनसान वातावरणात तीला खुप भिती वाटे.

     घरी आई बाबांना हे सांगण्यात काहीच अर्थ नव्हता.तीने आपल्या मनातील ही भिती  आपली प्रिय सखी वंदनाला,सांगितली.वंदना त्याच गावात लहानाची मोठी झाली होती.तीने सुजाताला जपुन रहायचा सल्ला दिला.कारण ती ह्या टोळक्यातील मुलांना चांगलीच ओळखत होती.सर्व बडे बाप के बेटे,व पोचलेले मवाली गुंड होते.

      आजतर फारच उशिर झाला होता.जीव मुठीत धरूनच,सुजाताने हायवे सोडला व शेताच्या रस्त्याला,तीची गाडी लागली.आज नेहमीप्रमाणे ते टोळके, हायवेला दिसले नाही म्हणून मनात तीला हायसे वाटले.

      दोन्ही बाजुंनी ऊसाचे दाट मळे होते,व रस्त्यावर पुर्ण काळोख!.फक्त तीच्या गाडीच्या लाईटवर,ती रस्ता आक्रमत होती.

    एवढ्यात,समोरील रस्ता झाड आडवे ठेवून बंद केलेला दिसला.ती गाडी बंद करून खाली उतरली.काय होते आहे ते कळायच्या आतच,ती बाजुच्या शेतात ओढली गेली.

        तीच्या एकटेपणाचा,व अंधाराचा फायदा त्या गुंडानी घेतला.तनावर व मनावर खुप जखमा घेत,ती कशीबशी घरी पोचली.तीची ती अवस्था बघुन तीचे आईवडील तर ढेपाळूनच गेले.

          हळूहळू  तीच्या कामाच्या ठिकाणी,व पुर्ण गावात ही बातमी पोचली.सर्व जण हळहळतच,तीला भेटायला घरी येऊन गेले.वंदनाहीआली होती.

        आपल्या मैत्रीणीची अशी दशा करणाऱ्या ,लोकांची तीला मनस्वी चिड येत होती.सुजातातर मनाने पुर्ण कोलमडूनच पडली होती.गावात अश्या २,३ मुलींना ह्या टोळक्याने नासवले होते.पण गरिबी व ह्या श्रीमंत बापाच्या मुलांविरूद्ध,आवाज उठवायची कोणाची हिंमत नव्हती.

   वंदनाने ठरवले ह्या नराधमी असुरांना चांगलाच,धडा शिकवायचा.कायदा काय करेल ती शिक्षा करेल,पण त्यांना जन्माची अद्दल घडवायची.

      वंदनाचा भाऊ,व त्याचे ४,५ मित्र ह्यांना वंदनाने योजना समजावली.सर्वांनी तीला पडेल ती मदत करायचे कबूल केले.

   सुजातावरच्या बलात्काराला,१५,२० दिवस होईपर्यंत हे टोळके गावातून गायबच झाले होते.तेवढा वेळ वंदनाला तयारी करण्यासाठी पुरेसा होता.सुजाताच्या बाजूच्याच ईमारतीमध्ये वंदनाने तात्पुरती जागा घेतली.भावासह राहणारी वंदना खुप धाडसी व कराटे चॅम्पियन होती तीने ठरवले” म्हातारी मेली तरी चालेल पण काळ सोकवता कामा नये”.

   साधारण १महिन्यानंतर परत ते टोळके,नविन सावजाच्या शोधात हायवेच्या कडेला बसलेले तीला दिसले.

   मनातून ती खुषच झाली.त्यांच्या नजरेच्या टप्प्यात ती यायचा प्रयत्न करू लागली.तीने ठरवले होते १/१ला गाठून धडा शिकवायचा. ती मुद्दामुन उशीरा एकटीच त्या सुनसान रस्त्यावरून एकटीच बाईकने जायची.

गेले ३,४ दिवस ते टोळके तीच्यावर शेरे मारू लागले.तीने घाबरण्याचे नाटक सुरू केले.

        सध्या सुजाताचे व तीचे काम ती एकटीच करत असल्याने, तीला तसाही उशिर होत असे.

     आणि तो दिवस उजाडला!.वंदनाने घडाळ्यात बघितले रात्रीचे ८.३० वाजलेत.थोड्या धाकधुक मनानेच तीने भावाला फोनवर आॅफिसमधून  निघत असल्याचे कळवले.

   हायवेला तीची गाडी आली तेव्हा ,कुणीच नव्हते,हा सुजाताने सांगितल्याप्रमाणेच योग  असावा ,असे वाटून तीने भावाला फोन  केला व मित्रांसोबत शेताच्या आसपास रहायला  सांगितले.डिकीमधिल २ कोयते कमरेच्या ओढणीत खोचले.व जाडजूड सायकलीची चेन पायाशी ठेवली.

    शेताच्या रस्त्यावर आडवे झाड बघताच ती सावध झाली.पायाजवळची चेन हाताला गुंडाळत ती बाईकवरून उतरली.चारी बाजूने घेराव घालणाऱ्या मुलांवर  ती चेनने चौफेर फटके मारू लागली,कोयत्याचे सपासप वार करत ,गुप्त जागी लाथा मारत तीने त्यांना अर्धमेले केले.

 रणचंडिकेप्रमाणे लढणाऱ्या बहिणीला भाऊ बघतच राहिला.

  भावाच्या मदतीने पोलीसांकडे सगळ्यांना सुपुर्द केले. सुजाताने  व पिडीत मुलींनी ओळख परेड मध्ये ओळखुन  गुन्हा सिद्ध झाला.

 अशी आ धुनिक असुरांचा बिमोड करणारी महिषासुर मर्दिनी!.

error: