शब्द रजनी साहित्य समुह उपक्रम
चर्चा सत्र मराठी भाषेला लागलेली उतरती कळा:-

आजचा विषय फारच व्यापक व गहन आहे!
१)मराठी भाषेचे अस्तित्व संपेल का?
नजिकच्या शेकडो वर्षात तरी ह्या भाषेचे अस्तित्व संपेल असे वाटत नाही.शेकडो वर्षांपूर्वी “पाली”भाषा बोलली जात असे.आज तीचा मागमुसही नाही परंतु सध्या व प्राचीन काळापासून खुप अजरामर साहित्यनिर्मिती झाली आहे मराठीत,त्यामुळे मराठी भाषा संपेल असे वाटत नाही.मराठी भाषिक देशा परदेशात विखुरले आहेत .महाराष्ट्र मंडळांची स्थापना करून ते मराठीची व आपल्या परंपराची जोपासना करत आहेत.
२)मातृभाषेला उतरती कळा वा तीचे कमी होणारे महत्व:-हा कालसापेक्ष परिणाम असल्याने ही भिती वाटतेय.पुर्वी फक्त बोली भाषेचा उपयोग शिक्षणात वा व्यवहारी होत असे.ब्रिटीश राजवटीनंतर,जगाचे ज्ञान दरवाजे उघडण्यासाठी,इंग्लिश,फ्रेंच,जर्मन,जपानी भाषा शिकण्याची निकड भासू लागली व लोक त्याचा आश्रय घेतांना दिसू लागलीत.पणम्हणून मातृभाषेचे महत्व कुठेही कमी झाले नाही.थोडे मराठीचे जागतिक बाजारपेठेत महत्व कमी असल्याने,ह्या परकीय भाषा शिकण्याकडे कल वाढलाय.पण प्रेम मातृभाषेवरच आहे.परदेशात स्थायिक होणारी नविन पिढी आपल्या मुलांना मराठी शिकवण्याचा अट्टाहास धरतात,जेणेकरुन त्यांची नाळ मायभुमीला व मातृभाषेला जोडली जावी.
३)मराठी टिकवण्यासाठी,सर्वांनी सक्तीने घरात मराठी बोलून नविन पिढीला भाषेच्या समृद्धीची जाणीव करून द्यायला हवी.शक्य तेवढे व्यवहार मराठीत करावे भाषेची लाज न बाळगता!नव नविन दर्जेदार साहित्य मराठीत निर्माण झाले पाहिजे व त्याची गोडी शाळेपासुनच लावली पाहिजे.
४)माझ्यामते कुठल्याही माध्यमात,शिक्षण झाले असले तरी,मातृभाषेवर प्रभुत्व तेव्हाच रहाते,जेव्हा मुलांना आपण भाषेची गोडी लावतो.व्यवहाराच्या द्रुष्टीकोनातुन इंग्रजी भाषेत शिक्षण देणे,कधी कधी अपरिहार्य ठरते.माझ्या दोन्ही मुलांची शिक्षणे,इंग्रजी माध्यमातून झाली पण शाळेत मनाचे श्लोक,मारूती स्तोत्र,दैनिक पठनाला होते.व दहिहंडी,गणेशोत्सव संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी साजरे करत.आज माझा मोठा मुलगा,इंग्लडमध्ये राहून,मराठीत अग्रलेख लिहीतो,कविता करतो! माध्यम कुठेच भाषेला अडसर ठरले नाही.तरी सोयीनुसार शिक्षणाचे माध्यम ठरवावे,भाषेचे संस्कार आपण करावेत.
५)मराठी भाषेवर अनेक परकीय भाषेंचे आक्रमण झाले पण,त्या,त्या प्रातांतील बोली भाषा व मराठीची सांगड व्यवहारानिमित्ताने घातली गेल्याने हे झाले आहे.मूळ भाषेचा गाभा मराठी रहावा म्हणून तसे वातावरण निर्माण झाले पाहिजे.
६)महाराष्ट्र सरकारने,मराठी भाषेत व्यवहार,व सर्व शाळांमध्ये प्रथम विषय मराठी सक्तीचा करावा.व नोकरी देण्यापुर्वी उमेदवाराला मराठी भाषा अवगत असणे सक्तीचे केले तरच ,महाराष्ट्रातच जे मराठीचे,खच्चीकरण झालेय ते थांबेल!.

error: