विषय:- अंधश्रद्धा !

“दिव्यत्वाची जेथ प्रचिती,तेथे कर माझे जुळती.”
लहानपणापासून मनावर कोरले गेलेले संस्कार!माझ्या मुलांना पण मी हेच बाळकडू पाजले.
मुंबईत जन्मलेली मी,व माझे विज्ञानाची कास असलेले पालक, फक्त कर्मावर,व देवावर श्रद्धा ठेवतो.बाबा,महाराज,भोंदूगिरी,अंधश्रद्धा असे शब्द मी पाठ्यपुस्तकात वाचत आले होते.
मांजर आडवी जाणे,देवाचा कोप,अंगात येणे,मांत्रिकाचे तोडगे,ह्या सगळ्या प्रथांशी अगदी जवळून ओळख झाली,ती वयाच्या ११व्या वर्षी ,जेव्हा बाबांची बदली एका खेडेगावात झाली होती!
मी,आई-बाबा सगळे ह्या कशा अंधश्रद्धा आहेत,विज्ञान किती पुढे गेलेय हे जीव तोडून सांगत असू!पण पालथ्या घड्यावर पाणी होते!.
उलट आम्हालाच धडा शिकवण्यासाठी,करणी,भानामती,सारखे प्रयोग सुरू झाले!रोज दारात कुंकु लावलेले लिंबू येऊन पडे,कपड्यांना कात्री लावली जाई. पण आम्ही त्याला घाबरत नव्हतो,उलटपक्षी विज्ञानाच्या नविन युगाशी त्यांची ओळख वाढवत गेलो व सगळे चाळे थांबले.
मांत्रिकाकडून न उतरवली,गेलेली कावीळ आईच्या आयुर्वेदामूळे बरी झाली,तेव्हा तर आमच्या शेजाऱ्यांनी आईचे पायच धरले!.
श्रद्धा व अंधश्रद्धा ह्यात बारीक रेघ आहे!सत्कर्म व चांगल्या विचारांवर ठेवलेली श्रद्धा,व एखाद्या वाईट प्रथेला बळी पडून त्यावर ठेवलेली श्रद्धा ह्यात जमिन आस्मानाचा फरक आहे.पहिली श्रद्धा आपल्याला चांगला मार्ग दाखवते,तर दुसऱ्या श्रद्धेच्या आहारी जाणे म्हणजे अंधश्रद्धा होय!.
आज कामाच्या निमित्ताने,पर्यटनासाठी खुप जगप्रवास केलाय.तिथली संस्कृती जवळून आभ्यासली आहे.तेव्हा तर आपल्या देशांतील काही अंधश्रद्धांची किव येते!मन विषण्ण होते.
धर्माच्या नावाखाली चालणारे यज्ञयाग,निष्पाप पशुबळी,सगळ्या परपंरा कधी अंधश्रद्धेचे रूप घेतात,ते करणाऱ्याला देखील कळत नाही!.
ज्ञानेश्वर,तुकाराम ,एकनाथ महाराज,रामदासस्वामी सगळ्यांनी ह्या अंधश्रद्धेशी लढत समाजप्रबोधन केले.”अंनिस”सारखी चळवळ ह्या प्रथांची पायमल्ली करू बघत आहे!
सुशिक्षित समाजाने जे “डोळ्यावर कातडे पांघरून”आपल्याला काय करायचे आहे?ह्या भूमिकेत बदल केला पाहिजे.अजुनही गावोगावी हातचलाखी करणारे बाबा,महाराज ह्यांच्या आश्रमांपुढे,नविन पिढी रांग लावतांना दिसते.
ह्या साठी समाज तळागाळातून बदलला पाहीजे!विचारपरिवर्तनाने
जेव्हा
“विज्ञानाचे रोप घरोघरी वाढेल!
अंधश्रद्धा तेव्हाच पाय काढेल,
कास धरू रे मनी अशी,
देशाची प्रगती,करू खाशी!”.

error: