Kids Stories

For 2 to 12 years

गोष्टींचे विश्व

लहान मुलांचे विश्व ,त्यांच्या आवडत्या प्राण्यांमध्ये एकवटले असते.तर जरा मोठे झाल्यावर त्यांना जंगलातले प्राणी खुणावतात. अश्या सगळ्या लहान मोठ्या प्राण्यांना तुम्ही ह्या कथांद्वारे भेटाल. राजा राणी,राजपुत्र ह्यांचे अद्भुत रम्य विश्व .हे खोटे जग भुरळ पाडणारे असते.पण रंजक असते. आई-वडील,भाऊ बहिण. ह्या पलिकडे नातेअसते मैत्रीचे घट्टमुठ्ठ.ह्या नात्याच्या कथा ह्यात वाचा. जादू शब्दातच जादू आहे.ह्या आभासी पण हव्यहव्याश्या वाटणाऱ्या दुनियेत घेऊन जाण्याऱ्या ह्या कथा!  ऐका वाचा आणि रमा!

झूम झाम ऍम्ब्युलन्स ची गोष्ट

छोट्या वेदने तयार केलेली, आजीने सांगितलेली गोष्ट

शाळेचा पहिला दिवस

|

प्रतिक्रिया

माझी मैत्रीण मीना भालेराव हिने सांगितलेल्या काही गोष्टी मी माझ्या पांच वर्षाच्या अमेरिकेतील नातवाला नेहमी ऐकवत असते. मीना अगदी लहान मुलांच्या भावविश्वात घडणाऱ्या गोष्टी सांगत असल्याने माझ्या नातवाला खूपच आवडतात आणि तो त्यात रमून जातो .
मीनाच्या आवाजातील लय चढ उतार मुलांना खूप आवडतो. बनी rabbit चा वाढदिवस,एमिली elephant ची पिकनिक ह्या रोजच्या लहान मुलांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी त्यांना आपल्याच वाटतात. महत्वाचे म्हणजे ह्या गोष्टी तिच्या स्वतः अनुभवातून उतरलेल्या आहेत. तसंच माझा एक special नातू आहे. त्याला तर ह्या गोष्टी म्हणजे अगदी मेजवानीच असते. मग तो गोष्ट ऐकत जेवतो झोपतो, ह्या गोष्टींनी तो एकटा पण रमतो. मीनाच्या stories मधले खास आकर्षण म्हणजे ती मुलांच्या आवडत्या प्राण्यांना लहान मूल बनवते आणि मुलांना प्राण्यांच्या विश्वात नेते.शेवटी सर्वात महत्वाचे प्रत्येक कथे मध्ये मुलांच्या मानावर सुसंस्कार केले गेलेत, Good आणि bad शिकवते.
तिच्या ह्या उपक्रमाला माझ्या खूप शुभेच्छा???

सुनेत्रा कोतवाल
error: