काव्य

जेव्हा भावना मनात दाटतात व कागदावर उमटतात कविता बनत जाते!अश्या वेगवेगळ्या थाटातील कविता ह्या सदराखाली तुम्ही अनुभवाल.

मनातील कविता

दशपदी काव्य

कान्हा वाजवितो बासरी!

शिर्षक:-आळवणी

श्रावण अष्टमीस बाई,नवल ते घडले!

कारागृही देवकीपोटी,श्री हरी जन्मले! ।।१।।

 

देवकीचा अलौकिक सुत हा,वाढे नंदाघरी !

नंदनवन हे जणू फुलले ,आहे यमुनेतीरी ! ।।२।।

Read More…

अष्टाक्षरी काव्य

भू मंडळ सजले हे!

तगमग,तगमग

धरतीस ,ह्या जाहली!

कधी ,येई पावसाळा?

मनी, संचीत बैसली !

 

आतुरता,मिलनाची ,

Read More…

मुक्तछंद काव्य

निर्णय

“जरा येऊन जातेस का? “थरथरतया आवाजात

समोरच्या आजींचा फोन आला,

आणि माझ्या पोटात मोठठा गोळाच उठला!

गिळता येत नाहीये ,कसकसही आहे अंगात,

कोरोनाचीच लक्षणे , आजी सांगत होत्या क्रमात !

फोन ऐकताच माझा पुर्ण देह शहारला,

Read More…

काव्य

अनंत जन्माची पुण्याई!

शिर्षक:-मातृभुमी

 

अनंत जन्माची पुण्याई,

लाभली अशी ही ,भारत भुमी !

 

घेतोय इथे मोकळा श्वास !

नाही पारतंत्र्याच्या विळख्यात

Read More…

 

अष्टाक्षरी काव्य

तुज नमो क्रांतीविरा !

शिर्षक:-महानायक !

 

जन्मुनी ,बंगाल प्रांती,

स्वातंत्र्याचा ,ध्यास ,घेई!

सुखी आयुष्य,त्यागुनी ,

इतिहासा ,दिशा देई !

 

Read More…

गवळण

का रे असा छळतोस?

का रे छळतोस असा मनोहरा?

यशोदा पुसे धरूनीया करा!

 

गोप गोपींना छेडीसी,

दही दुध लोणी पळविसी!

लाज माझी काढूनी ,लाघवी हसतोस?

का रे चित्तचोरा छळतोस?

Read More…

 

काव्यपुर्ती

सरसर पाऊस पडतोय रे !

शिर्षक:-संतत धार

 

सरसर पाऊस पडतोय रे !

आसमंत धुंद झालाय रे !

 

अत्तराचा फाया उघडला,

मृदगंधाने जीव वेडावला ,

Read More…

दशपदी काव्य

श्रावणी छटा !

शिर्षक:-श्रावण -बहार !

 

आला आला श्रावण,सणासुदीचा न्यारा महिना !

व्रत वैकल्ये किती?दिन सरे कसा ते कळेना ! ।।१।।

 

आषाढात कोसळून,नभ गेले बघा गळून !

श्रावणातली सर येई,संगे घेऊनीया उन ! ।।२।।

Read More…

 

काव्य

रम्य ते बालपण !

 

रम्य ते बालपण,चिंचा बोरांची आठवण,

गोट्या,चिंचोके,खडू ,माळा,तिकीटे,

दप्तरभर साठवण !

 

शाळेत रमत गमत तासाभराचे जाणे,

कधी कट्टी,वा बट्टी, आणाभाकांचे बोलणे !

Read More…

काव्यपुर्ती

फक्त तुझ्याच साठी!

 शिर्षक:-रे गणराया!

 

तुझ्याच साठी गणराया!

आता सावरलय मन!

गोळा केला आत्मविश्वास,

अन् जागृत केले तन!

 

Read More…

 

काव्यपुर्ती

गणेश आरती

जय जय श्री गणेशा,तू बुद्धीदाता

सप्रेम ओवाळू तुजला,तू सुखकर्ता।।

 

विघ्नहर्त्या तुजला कार्यारंभी,पुजीतो

निर्विघ्नतेची ग्वाही,तू आम्हा देतो

भक्तसंकटी पडता,तू असतो त्राता

 

Read More...

 

काव्यपुर्ती

पैठणी

शिर्षक:-मायेची पैठणी!

स्त्री सुलभ लज्जेने,मोठी होत गेले
साडी नेसण्यासाठी,मन अधिरे झाले!
सुंदर जरतारी काठ,बुट्टेदार नक्षी
मऊ रेशमी स्पर्शासाठी,मन आसुसले!

नव्हती मनाला तेव्हा,पैठणीची ओळख!
साध्या मोहक रेशमामध्ये,जीव होता रमत!
पण एके दिनी,आईला खास आली भेट!

 

Read More…

 

अभंग लेखन.

जन्म बाईचा.

शीर्षक:- भाग्य.

बाईचा बाईचा | जन्म सोसण्याचा |
कष्ट झेलण्याचा | अविरत ||१||

विचार जुनाट | नका करु असे |
ज्ञान संपादसे | नारी जगी ||२||

ईश्वराची सृष्टी | सौंदर्ये नटली |
परी उदासली |नारी वीना||३||

गृहिणीचा हात | फिरे सदनात |
प्रसन्न मनात | वाटतसे||४||

शक्ती अंतरीची | नारीने जाणिली |
प्रगती साधली | अलौकिक ||५||

जन्म हा बाईचा | व्यर्थ फुका बाई |
असे म्हणू नाही | चुकुनही ||६||

मीना म्हणे देवा | भाग्य मज दिले |
कन्या जन्मा आले | तव कृपे ||७||.

 

 

गीत लेखन.

आई माऊली गं माझी.

शीर्षक:- अंबेची आराधना.

आई माऊली गं माझी,सुख दुःखात सावली,
मनोभावे आराधना,अंबा मजसी पावली !||धृ||

नऊ दिन चालतसे,अंबे तुझाच जागर,
संकटात वेगे वेगे,भक्तां पावसी सत्वर,
ओढ वाटे मनी तुझी, मुर्ती नयनी भावली,
आई माऊली गं माझी,सुख दुःखात सावली,
मनोभावे आराधना, अंबा मजसी पावली||१||

रंगीबेरंगी साडीचा,साज तुज चढवला,
अलंकार नानाविध,थाट तुझा वाढवला,
झेंडू फुलांची मालाच, तुजसाठी गं ओवली,
आई माऊली गं माझी,सुख दुःखात सावली,
मनोभावे आराधना, अंबा मजसी पावली!||२||

आदिशक्ती भवानीचे,रूप तुझे गं साजरे,
दृष्टी ढळतां ढळेना,मन होतसे बावरे,
ज्योत मंद समईची,तुज समोर लावली,
आई माऊली गं माझी, सुख दुःखात सावली,
मनोभावे आराधना, अंबा मजसी पावली!||३||.

 

मुक्तछंद काव्यलेखन.

स्त्री

शीर्षक:- कोण आहे मी?

स्त्री…..
कोण आहे मी?
अबला, की सबला..
एक कन्या,एक बहिण,
एक पत्नी,एक आई इ.इ…..
सगळ्यांशी नाते असुनही,
नेहमी एकटीच का मी?
भाऊ,वडिल,नवरा,सासरे
मित्र सगळे जवळचे पुरुष!
पण वयात आल्यावर मात्र,
सगळेच परके…….
घरी दारी मर्यादेचे कुंपण,
समजुतदारपणाची अंगावर शाल!
त्यागाचा वसा ओटीत…
शैक्षणिक, सामाजिक सगळ्या,
उच्च पदव्यांचे तुकडे तुकडे करतात,
हे पुरूष पशुत्वाला उतरताना….
म्हणून काय मी सतत भिऊनच जगायचं?
आकाशाला गवसणी घालणारे पंखच छाटायचे?
देवा तू तरी सांग..
मी..
आदिशक्ती म्हणून मिरवू ..
की…
अबला?.

काव्यपुर्ती

चित्रकाव्य.

शिर्षक:-प्रित

 

तुझी ,माझी प्रित बहरते,
या यमुनेतीरी!
किती विश्वासे ,मान टाकीसी
तू मम् खांद्यावरी!

साक्ष देण्या उभा आहे,

 

Read More…

error: