चारोळी

जेव्हा भावना मनात दाटतात व कागदावर उमटतात कविता बनत जाते!अश्या वेगवेगळ्या थाटातील कविता ह्या सदराखाली तुम्ही अनुभवाल.

मनातील चारोळी

मनांगणात माझ्या

शिर्षक :- प्रतिबिंब

आज कुणाचे उमटले हे?

प्रतिबिंब मनाच्या आरश्यात!

नाचे मनमयुर मनांगणात माझ्या,

लक्ष न लागे,कशा कश्यात!.

मनांगणात माझ्या

शिर्षक:- कृष्ण-पावा

पावा मधुर श्रीकृष्णाचा,

घुमतोय मनांगणात माझीया!

राधा होऊन सैरभैर झाले,

भेटण्यास ह्या सावरिया!.

 

चारोळी

कवियत्री बहिणाबाई चौधरी

शिर्षक:- ज्ञानसागरू!

निरक्षर असूनी उधळी,

ज्ञानीयाचे भांडार जगाठायी!

चारोळी

डाॅक्टर डाॅक्टर!

शिर्षक:- प्राणदाता!

जनसेवा मानी ईश्वरसेवा!

लाखोंचा हा प्राणदाता!

 

 

चारोळी

पौर्णिमा

शिर्षक:- झुंबर नभीचे!

चकाकणारे झुंबर नभी,

आज कुणी टांगले?

चारोळी

पौर्णिमा

शिर्षक:-लेणे तेजाचे!

पौर्णिमेचा चंद्र उगवतां ,

प्रित सागरा येई भरती!

कोपरखळी

पडद्यावरील माधुरी,

हळूच डोळा मारून हसते,

घरातल्या बाजीरावाला,

कुणाची बरे उचकी लागते?

कोपरखळी

राजकारणी करतात,

आरोपांची चिखलफेक!

धुळवडीला रंग चढतो,

भरडला जातो त्यात प्रत्येक!.

 

कोपरखळी

वसंताची चाहुल लागता,

कोकीळेस कंठ फुटतो!

निवडणुक जवळ येतां,

जो तो मतदारास भेटतो!.

कोपरखळी

जे न देखे रवी,

ते देखे कवी!

कवींच्या मनात फुटते,

रोज एक लाट नवी!.

कोपरखळी

लाॅकडाऊनच्या काळात,

सुखी झाली गृहीणी घरातली!

ज्याला त्याला कामे वाटून ,

तिने वाटणी केली श्रमांतली!

काव्यपुर्ती

चित्रकाव्य.

शिर्षक:-प्रित

 

तुझी ,माझी प्रित बहरते,
या यमुनेतीरी!
किती विश्वासे ,मान टाकीसी
तू मम् खांद्यावरी!

साक्ष देण्या उभा आहे,

 

Read More…

error: