मातृत्व

सोपे नसते कधी आई होणे,

कुणाचीच,मुलांची वा नवऱ्याची!

सतत फक्त दुसऱ्याच मन जपायच!

होते राख रांगोळी आशा आकांक्षाची,

किंमत मोजली जाते स्री असण्याची,

बीज रूजल्यापासुनच सुरू होतात वेदना,

क्षणभर त्या सुखावह असतात,

पण वेदनाच जपाव्या लागतात आयुष्यभर!

सतत मन मारून जगायच!

पण म्हणून मातृत्वाची आस कमी होत नाही!

आई बनून प्रत्येकाची चूक पोटी घालणे बाई सोडत नाही!.

error: