About Us

परदेशी असणाऱ्या नातवंडाशी, भावबंध जपण्यासाठी रोज त्यांच्यासाठी गोष्टी लिहून रेकाॅर्ड करून पाठवण्याचा उपक्रम सुरू केला. मग मनात एक कल्पना आली की ह्या गोष्टींचा आनंद त्यांचे सह बालमित्र पण घेऊ शकतील अशी योजना करावी.
लहानपणा पासून लिखाणाचा छंद होताच! काव्य, कथा, स्फुट लेखनाबरोबरच बालसाहित्य जोम धरू लागले. सध्या सर्व प्रकारचे लेखन करतेय. तुम्हालाही त्याचा आनंद एकाच ठिकाणी घेता यावा म्हणून मुद्दामुन बाल गोष्टींबरोबर कथा व काव्य व स्फुट लेखन (blogs) पण इथेच सुरू केलेय.

Vision

लौकिक अर्थाने शिक्षण घेणं, गुण मिळवणं, यशस्वी होणं आणि मोठं झाल्यावर व्यावसायिक यश मिळवून देण्यास आवश्यक असलेली ‘गुणवत्ता कमावणं’ हे आजकाल तुलनेनं सोपं झालं आहे. असे विद्यार्थी आणि युवा घडवण्याचा तांत्रिक साचा आपल्याला सापडला आहे, असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. पण हा साचा ‘सब घोडे बारा टके’ अशी यांत्रिक माणसं घडवतो.पण बाळ जन्माला येतं तेव्हापासून किंवा खरं तर त्याच्याही आधी, आईच्या गर्भातच, त्याची एक वेगळी ओळख, एक वेगळं व्यक्तिमत्व तयार व्हायला सुरुवात झाली असते. आणि प्रत्येक व्यक्तिमत्व ‘वेगळं’ असते. तेव्हा ते घडवताना, त्याला पैलू पाडताना, यंत्र घडवल्यासारखी प्रगती म्हणजे सर्वांगीण विका नव्हे, तर ‘माणूस’ म्हणून तो/ती समृद्ध होईल, असे पैलू पाडणारे शिक्षण म्हणजे ‘सर्वांगीण विकास’!

हाच सर्वांगीण विकास साधणे हेच आमचे Vision

Our Story

After spending 21 years working for LIC of India, Mrs Meena Shamkant Bhalerao decided to take a break and pursue her passions. Her stories and poems have been well received. She enjoys her time painting, learning music, and being creative. However, she derives the most pleasure in teaching children creative art forms. This website is a result of her writing stories for her grandson who loves listening to ‘Aji chya goshti’

.

सर्वांगीण विकास

पुस्तकी शिक्षणाबरोबरच विविध छंद जोपासण्यासाठीचे वर्ग लावून देणे, एक खेळ, बालसंस्कार वर्ग, एखादं वाद्य किंवा संगीत शिकवणे वगैरे कोर्सेस मधून आपण ‘सर्वांगीण विकास’ करतोय असा काहीसा पालकांचा समज झालेला आहे. मात्र, फैशन म्हणून हे सगळं शिकण्यापेक्षा संस्कृतीशी, माणूसकीच्या प्रवाहाशी त्यांची नाळ जुळलेली ठेवणं, कितीही विपरीत परिस्थितीत त्यांच्यातली मूल्ये आणि माणुसकी, दया आणि प्रेम या भावना विझणार नाहीत, नष्ट होणार नाहीत, असं कणखर मन आणि ते मन संभाळणारं कवच म्हणून निरोगी शरीर तयार करणं म्हणजे सर्वांगीण विकास!!

कोवळ्या मनांवर झालेले संस्कार हे कायमस्वरूपी !

हा सर्वांगीण विकास करणं अजिबात सोपं काम नाही. निसर्गाची सर्वोत्तम रचना म्हणजे मानव ! आणि चिमुकल्या बाळाला वाढवत असतांनाच त्यातून एक उत्तम व्यक्ती घडवणारे पालक जे संस्कार करतात, ते त्या मुलाचं पुढचं संपूर्ण आयुष्य ठरवणारे असतात. केवळ पालक किंवा शिक्षकांनी शिकवलेलेच नाही, तर आजूबाजूचं वातावरण, माणसं, कोवळ्या वयात ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टी, घडणाऱ्या घटना या सगळ्यांचा मुलांवर मोठा प्रभाव पडत असतो. त्यामुळे, या कोवळ्या वयातल्या जडणघडणीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. या वयात, शरीरावर-मेंदूवर, मनावर आणि आत्म्यावरही झालेले संस्कार कायमचे कोरले जातात. जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो, तरीही, याच वयात आपण जे शिकत असतो, त्यातून आपल्या मुळांशी, संस्कृतीशी आपली मुळे घट्ट जोडलेली राहू शकतात. मात्र त्यासाठी आपण अधिक सजग असण्याची गरज आहे.

बालोपयोगी संस्कार साहित्य

१.  गणपती स्तोत्र

गणपती स्तोत्र

२.  रामरक्षा स्तोत्र

रामरक्षा स्तोत्र

३.  मनाचे श्लोक

मनाचे श्लोक

४.  मारुती स्तोत्र

मारुती स्तोत्र
error: