“नाही”

“नाही”किती नकारात्मक शब्द आहे!कोणालाच तो एेकायला वा बोलायला आवडत नाही.पण मंडळी “नाही”शब्द आयुष्यात म्हणता येणे खुप गरजेचे आहे.

नको असलेले लग्न,नको असलेल्या अपेक्षांचे ओझे, नाही म्हणण्याने टाळता येते व आयुष्य जास्त सुकर बनत जाते.नको असलेल्या संबधाना पण वेळीच नाही म्हटले तर,खुप प्रश्न आपोआप सुटतात!

लहान मुलांना पण योग्य संस्कार,करतांना त्यांच्या नको त्या हट्टांना,वेळीच नाहीचे वळण लावले तर प्रत्येक गोष्टीची किंमत त्यांना कळत जाते.

“नाही” कसे म्हणायचे? हा मोठा प्रश्न बनतो नातेसंबध टिकवतांना!पण जी नाती द्रुढ असतात,ती कुठल्याही प्रसंगात विचारपुर्वक टिकवली जातातच.तुटतात ते तकलादू संबंध वा नाते!

आयुष्यभर भिडस्तपणे मरत मरत जगण्यापेक्षा,एकदा शूरपणे “नाही”म्हणून कठीण जागेवरचे गळू फोडून तर बघा! नको त्या गोष्टींचा निचरा होऊन,कसा मोकळा श्वास आयुष्यात घेता येतो ते!.

error: